
- 06 Oct 2021
- Admin
- Social Wall
- Comments: 0
आज सकाळी दिनांक ६ ऑक्टोबर २०२१ रोजी लोकमंगल फाउंडेशनच्या (Lokmangal Foundation Solapur) अन्नपूर्णा योजना या ठिकाणी DK TECHNO’S (Best IT Company In Solapur) तर्फे पूजा करण्यात आली हा मान आम्हाला दिल्याबद्दल आम्ही त्यांचे ऋणी आहोत. या माध्यमातून आम्ही लोकमंगल फाउंडेशन साठी सामाजिक बांधिलकी म्हणून जोडले जाऊ. लोकमंगल फाउंडेशन व DK TECHNO’S च्या सहकार्याने काही प्रोजेक्ट नक्कीच भविष्यात समोर येतील.
अन्नपूर्णा योजनेच्या माध्यमातून दररोज 500 पेक्षा जास्त निराधार लोकांना दोन वेळच्या जेवणाची सोय केली जाते त्यांना डबा घरपोच केला जातो. आज पर्यंत साडेनऊ लाखांपेक्षा अधिक डबे या योजनेमार्फत निराधार लोकांना आणि दवाखान्यात पोचवण्यात आले आहेत.
यावेळी DK Techno’s चे संस्थापक धिरज करळे व मार्केटिंग हेड बिराजदार एम.डी. हे उपस्थित होते.